Toll Free Number : 1800-2-66 66 66 66
Toll Free Number : 1800-2-66 66 66 66
तपासणी ते उपचार आरोग्य योजना सेवेबद्दल
मा पंतप्रधानांच्या आरोग्य सेवा तळागाळातील प्रत्येक देशबांधवापर्यंत विनासायास पोहोचिवण्याच्या या सेवाकार्यात खारीचा वाटा उचलण्याच्या मानिषेने कामगार विभागाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे, केंद्र शासनाच्या एचएलएल या अंगीकृत उपक्रमाच्या सहकार्याने “तपासणी ते उपचार” ही आरोग्य सेवा कार्यान्वित होत आहे. या सेवेला तपासणी ते उपचार आरोग्य योजना असे नामकरण करण्यात येत आहे. तपासणी ते उपचार आरोग्य सेवेमुळे महाराष्ट्रातील १४ लाख बांधकाम कामगारांना संपूर्ण आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे.
राज्यातील नोंदीत बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना तपासणी, चाचण्या, निदान, उपचार, सुधार या आरोग्यसेवा एकाच छताखाली, एक खिडकी, स्वरूपात तत्परतेने, विनासायास, विनामूल्य, विश्वासार्हाने , वेळेवर", तसेच घरापर्यंत , कामाच्या ठिकाणापर्यंत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा हा महत्वाकांक्षी उपक्रम आहे.
या योजनेद्वारे बांधकाम कामगारांची नियमीत आरोग्य तपासणी, आरोग्य चांचण्या त्यामध्ये गंभीर आजार प्राथमिक लक्षणे दिसल्यास पुढील निदानासाठी विशेष तपासण्या/चाचण्या त्यासाठी आवश्यक अद्ययावत वैद्यकीय उपकरण ची उपलब्धता, तपासण्यांसाठी आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ, निष्कर्ष व निदानासाठी आवश्यक आरोग्य सेवा मनुष्यबळ - डॉक्टर / तंत्रज्ञ - यांची उपलब्धता निदानानंतर प्राथमिक ,द्विस्तरीय व त्रिस्तरीय उपचार व्यवस्थेसाठी (जसे डायलीसीस, के मोथेरपी वगैरे) उपकरणे उपलब्धता, विनामूल्य औषधोपचार पुरवठा आंतररुग्ण सेवा / भरतीसाठी इस्पितळ उपलब्धता, अद्ययावत हॉस्पिटलसोबत समन्वय (Tie - up), उपचारांचे सातत्य सुनियंत्रित (Monitor) करणे उपचारा नंतर शुशुश्रेची व्यवस्था, या सर्व बाबींची उपलब्धता आणि व्यवस्था या उपक्रमातून सुनिश्चित करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये MMU (Mobile मेडिकल युनिट) म्हणजेच Advanced Life सपोर्ट ने सुसज्ज असलेली मोबाइल वॅन कार्यान्वित करण्यात येत आहे. तसेच या सर्व सेवेची संपूर्ण माहिती असलेली website सुद्धा आज सुरु करण्यात येत आहे. जेणेकरून या सेवेची सर्व माहिती एका क्लीक वर उपलब्ध असेल. सर्व बांधकाम कागारांसाठी निशुल्क टोल फ्री क्रमांक सेवा याचाच एक भाग असेल. या निशुल्क टोल फ्री क्रमांकावर फोन करून बांधकाम कामगार MMU , क्लिनिक , हॉस्पिटल तसेच त्यांचे आरोग्य चाचणी अहवाल यांची माहिती घेऊ शकतात. याच निशुल्क टोल फ्री क्रमांकाद्वारे ते डॉक्टरांशी सुद्धा बोलू शकतात.
या योजनेद्वारे गरीब, कष्टकरी कामगार बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सेवा उपलब्ध करण्याचा मानस असल्याने त्यांना या योजनेची माहिती त्यांना समजेल अशा पद्धतीने देवून त्यांना सदुढृ आरोग्याची जाणीव करुन देण्यासाठी, प्रत्यक्ष भेटून, दृक्श्राव्य पद्धतीने ऑनलाईन तंत्रज्ञानाचा शक्य तेथे वापर करन त्यांना या संधीचा फायदा घेण्यासाठी उदुक्त करण्याची व्यवस्थाही या तपासणी ते उपचार आरोग्य योजना उपक्रमात अंतभर्तू आहे.
तपासणी ते उपचार आरोग्य योजना ही महाराष्ट्रातील गावागावातील गरीब, कष्टकरी कामगार बांधकाम कामगारांच्या जीवनात आरोग्य क्रांती ची सुरुवात करणार आहे यात काहीच शंका नाही.